शिक्षकांना मिळणार वेतनश्रेणी प्रशिक्षण
By Admin | Updated: May 31, 2014 23:24 IST2014-05-31T23:24:10+5:302014-05-31T23:24:10+5:30
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी विविध तालुक्यातील शिक्षकांचा समावेश असून प्रशिक्षण ३ ते ८ जूनपर्यंंत विविध केंद्रात चालणार आहे.

शिक्षकांना मिळणार वेतनश्रेणी प्रशिक्षण
चंद्रपूर : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी विविध तालुक्यातील शिक्षकांचा समावेश असून प्रशिक्षण ३ ते ८ जूनपर्यंंत विविध केंद्रात चालणार आहे.
निवड श्रेणी प्रशिक्षण हिंदी हायर सकंटरी स्कूल चंद्रपूर येथे चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, वरोरा, भद्रावती येथील ५१ तर सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर येथे, राजूरा, सावली, गोंडपिपरी, कोरपना, व गडचिरोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांंचा समावेश आहे. वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूर, चंद्रपूर आणि मूल, जिल्हा परिषद ज्युबिली हायस्कूलमध्ये चंद्रपूर तालुका, जनता हायस्कूल सिटी बँच बल्लारपूरमध्ये बल्लारपूर तालुकयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे कोरपना, जिवती तालुका, नेहरु विद्यालय चिमूर आणि संत भय्यूजी महाराज हायस्कूल चिमूर येथे चिमूर तालुका, डॉ.आंबेडकर विद्यालय ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील शिक्षकांना तर जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथे भद्रावती, वरोरा, शिवाजी हायस्कूल राजुरा येथे राजूरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, तसेच महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे सिंदेवाही, सावली तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांंना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे यांनी कळविले आहे.
(नगर प्रतिनिधी)