कर्मचाऱ्यांना आयकरात सवलत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:18+5:302021-04-03T04:24:18+5:30

ब्रम्हपुरी : सध्याच्या आयकर कररचनेत कोणतीही विशेष सवलत न दिल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. बऱ्याच ...

Employees should be given income tax relief | कर्मचाऱ्यांना आयकरात सवलत द्यावी

कर्मचाऱ्यांना आयकरात सवलत द्यावी

ब्रम्हपुरी : सध्याच्या आयकर कररचनेत कोणतीही विशेष सवलत न दिल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त रक्कम करकपात करावी लागल्याने असंतोष निर्माण झाला आहे.

कर रुपाने हाेणारी ही लूट थांबावी व कर रचनेत सुधारणा करून आयकरात सवलत द्यावी, यासाठी कृती संसाधन समिती, ब्रम्हपुरीद्वारा ॲड. नंदा फुले यांच्या नेतृत्त्वाखाली उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले. यावेळी स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारऐवजी दाेन लाख रुपये सवलत द्यावी, गुंतवणुकीतील सवलत ६ अ व ६ ब दीड लाख रुपयांऐवजी तीन लाख द्यावी, काेराेना याेध्दा कर्मचाऱ्यांना विशेष वेतनवाढ द्यावी, मानधनधारकांना २० टक्के वाढ द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी यशवंतराव खोब्रागडे, नामदेव कावळे, उमेश बागडे, आनंद रामटेके, भाऊराव मेश्राम, विजय फुले, संताेष करंबे, राजेंद्र माेटघरे, अनिल उंदिरवाडे उपस्थित होते.

Web Title: Employees should be given income tax relief