मेडिकल कॉलेजमध्ये समायोजनासाठी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:58 IST2019-03-06T22:58:07+5:302019-03-06T22:58:55+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयामधील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये समायोजन करावे या मागणीसाठी राज्यसरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी बुधवारी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान, जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

Employees boycott for adjustment in medical college | मेडिकल कॉलेजमध्ये समायोजनासाठी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

मेडिकल कॉलेजमध्ये समायोजनासाठी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

ठळक मुद्देआरोग्य सेवा विस्कळीत : जिल्हा सामान्य रुग्णालयात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयामधील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये समायोजन करावे या मागणीसाठी राज्यसरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी बुधवारी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान, जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर विपरित परिणाम झाला. शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत शासकीय कर्मचाºयांना वैद्यकीय महाविद्यालयात सेवेला लावले. मात्र त्यांचे वेतन तसेच इतर भत्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे अदा केल्या जात आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्येच समायोजन करावे या मागणीकरिता आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात तांत्रिक कर्मचारी, परिचारिका, सफाई कामगार आदी सरकारी कर्मचाºयांनी सहभाग घेतला. त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी समाविष्ठ करण्याची मागणी आहे. यासंदर्भात शासनस्तरावर पत्रव्यवहार करूनसुद्धा आरोग्य विभागाने लक्ष दिले नाही, आरोप कर्मचाºयांनी केला आहे.

Web Title: Employees boycott for adjustment in medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.