शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात आपातकालीन सेवा नावापुरतीच

By admin | Updated: February 5, 2016 00:48 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी गरिबांना ....

खडसंगी आरोग्य केंद्र : अपघातातील जखमीवर अर्धातासानंतर उपचार खडसंगी : ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी गरिबांना आपल्या जिवाला मुकावे लागू नये म्हणून शासनाने गावाची लोकसंख्या बघून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक महिन्यापासून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था ढेपाळली आहे. याचा प्रत्यय रविवारी आला.रविवारी एका अपघातात जखमी युवकावर उपचारासाठी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागल्याने येथील नागरिकांना आरोग्य विभागाची इमर्जन्सी सेवा कशी तत्पर आहे याचा प्रत्यय आला. त्यामुळे खडसंगी आरोग्य केंद्राची अत्यावश्यक सेवा नावालाच असल्याचे दिसून आले.चिमूर तालुक्यातील चिमूर- वरोरा मुख्य मार्गावर वसलेल्या खडसंगी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात ३० ते ४० गावांचे नागरिक उपचारासाठी येतात. तर मुख्य मार्ग असल्याने वेळीअवेळी अपघातग्रस्त रुग्ण येतात. आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यापासून येथील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने बाह्य रुग्ण सेवा एक- एक तास उशिरा सुरु होते. त्यामुळे रुग्णांना डॉक्टर व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे अनेक मजुरवर्गातील रुग्णांना काही प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागते. येथील काही कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाच्या अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान बसस्थानक परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या जखमी युवकाला काही गावातील तरुणांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून साधा चौकीदारही हजर नसल्याने रुग्णाला अर्धा तास तसेच ठेवावे लागले. काही युवकांनी वैद्यकीय अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला, तेव्हा कुठे एका परिचारिकांनी येऊन त्या रुग्णावर उपचार केलेत. मात्र या जखमी युवकाला उपचारासाठी चक्क अर्धातास विव्हळत राहावे लागले. अर्ध्या तासानंतर आलेल्या परिचारिकेने उपचार सुरु करताच नागरिकावर प्रश्नांची सरब्बती करीत समाजसेवा करायची तर पूर्ण करा, असे उलटसुलट प्रश्न केले.त्यामुळे अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत आरोग्य विभागाविषयी संताप व्यक्त केला आहे. नागरिकासोबत उर्मट वागणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)