Corona Virus in Chandrapur; ३०० युनिट वापरणाऱ्यांना वीज देयक माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:17 IST2020-03-30T20:16:27+5:302020-03-30T20:17:12+5:30
३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

Corona Virus in Chandrapur; ३०० युनिट वापरणाऱ्यांना वीज देयक माफ करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे गरीब चिंताग्रस्त आहेत. अशावेळी ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे देत आहोत. या संकटाच्या काळात शासनातर्फे नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे. या परिस्थितीत ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्यागरीब व मध्यमवर्गीय ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे .