तहसीलदारांच्या आदेशाने शेतातील चार मोटार पंपांची विद्युत खंडित

By Admin | Updated: May 20, 2017 01:16 IST2017-05-20T01:16:05+5:302017-05-20T01:16:05+5:30

देवाडा खुर्द येथील शेतकरी नळाचे पाणी पालेभाज्यांच्या सिंचनासाठी देत होते. पोंभुर्णा तहसीलदारांनी आदेश देऊन

Electricity break of four motor pumps in the farm by the permission of Tehsildar | तहसीलदारांच्या आदेशाने शेतातील चार मोटार पंपांची विद्युत खंडित

तहसीलदारांच्या आदेशाने शेतातील चार मोटार पंपांची विद्युत खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : देवाडा खुर्द येथील शेतकरी नळाचे पाणी पालेभाज्यांच्या सिंचनासाठी देत होते. पोंभुर्णा तहसीलदारांनी आदेश देऊन त्या मोटारपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
देवाडा खु. येथील काही शेतकरी आपल्या शेतातील पालेभाजी पिकाला अंधारी नदीवर पाण्याच्या टॉकीजवळ असेलले पाणी मोटारपंपाने देत होते. तेथूनच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. पिकाला पाणी देण्यामुळे गावातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते.
याबाबत येथील सरपंच विलास मोगरकार यांनी पोंभुर्णाचे तहसीलदार हरीश गाडे यांना हा विद्युतपुरठा बंद करण्याची विनंती केली. त्यानंतर तहसीलदारांनी पोंभुर्णा येथील विद्युत वितरण कंपनीला तत्काळ आदेश ुदिले.
अभियंता बाभुळकर आणि कनिष्ठ अभियंता पाटील यांनी लगेच त्या शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Electricity break of four motor pumps in the farm by the permission of Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.