शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

निवडणूक यंत्रणेने इव्हीएम मशीन परस्पर केल्या सील

By admin | Published: April 21, 2017 12:50 AM

मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर

नरेश पुगलियांचा आरोप : अधिकाऱ्यांना निवेदन सादरचंद्रपूर : मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर उमेदवारांची सही घेणे आवश्यक असते; मात्र निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सह्या न घेता परस्पर मतदान यंत्र सील केले. यामुळे मतदानानंतरच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणवार घोळ होऊ शकतो, अशी तक्रार काँगे्रसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरूवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.चंद्रपूर महानगर पालिकेसाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले. मतदानानंतर केंद्रांवरील इव्हिएम मशीन सील करण्यात आल्या. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ६.३० पर्यंत चालली. त्यानंतर बहुतेक केंद्रांवरील मशीन उपस्थित उमेदवारांच्या अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने सील न करता परस्पर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हा कमेटीचे अध्यक्ष गजाजनन गावंडे यांनी एका तक्रारीतून केला आहे. मनपाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, तथा पाचही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात माहिती देताना नरेश पुगलिया म्हणाले, मतदानानंतर सर्व इव्हिएम मशीन जिल्हा क्रीडा संकूलाच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आल्या. मशीन ठेवलेल्या हॉलला सील करताना उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेवून मनपाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सील करायला हव्या. त्यानंतर मतमोजणीच्या वेळी संबंधित उमेदवारांच्या समक्ष हे सील उघडले जावे, अशी पद्धत आहे. मात्र तसे न करता, हा हॉल सील करताना पाचही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या एका रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर एका उमेदवाराच्या पतीची स्वाक्षरी घेवून सील करण्यात आले. ही पद्धत चुकीची असून यात गैरप्रकाराला वाव असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी केला आहे. या संदर्भात पुगलिया पुढे म्हणाले, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ही पद्धत पाळली गेली आहे. मात्र या वेळी बगल देण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यावर काँग्रसचे प्रचार उपप्रमुख देवेंद्र बेले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सूचविले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने मनपाच्या आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट घडली नाही. त्यांना देण्यासाठी लेखी निवेदनही घेवून काँगे्रसचे कार्यकर्ते गेले असता त्यांनी भेटच दिली नाही. मतमोजणीच्या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांचीच राहील, असे पुगलिया या वेळी म्हणाले. वारंवार विनंती करूनही या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देणे चुकीचे आहे. मतमोजणीत गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्यास शहरात २४ तासात गंभीर परिणाम उमटतील, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला गावंडे गुरूजी, नंदू नागरकर, सुनिता लोढीया, प्रकाश इटनकर, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)