चिठ्ठया वाटण्याच्या नावावर सर्वच गटांचा निवडणूक प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:18+5:302021-01-15T04:23:18+5:30
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम स्थानिक प्रशासनावर असते. प्रत्येक निवडणुकीला मतदारांना आणि प्रत्यक्ष ...

चिठ्ठया वाटण्याच्या नावावर सर्वच गटांचा निवडणूक प्रचार
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम स्थानिक प्रशासनावर असते. प्रत्येक निवडणुकीला मतदारांना आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी बसलेल्या यंत्रणेला मतदारांचा भाग क्रमांक, मतदार यादी क्रमांक ,अनुक्रमांक ,मतदारांचे नाव अशाप्रकारे सोयीस्कर होण्यासाठी प्रचार बंद झाला की मतदारांना प्रशासनाच्या वतीने चिठ्ठ्या वाटल्या जातात. ही पद्धत मागील काही निवडणुकांपासून सुरू होती. यावेळीही तशीच पद्धत असेल असे समजून ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवार आणि गट शांत बसले होते. मात्र बुधवारी ही बाब लक्षात आल्यानंतर वेळेवरच चिठ्ठ्या छापून प्रचार कालावधी संपल्यानंतर गुरूवारला सर्वच राजकीय पक्षांचे गट चिठ्ठ्या वाटून पुन्हा दिवसभर एक प्रकारचा प्रचार करतानाचे चित्र पाहायला मिळाले.
बॉक्स
दारूचा पूर
मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने दारूमुक्त निवडणूक पार पडली होती. परंतु यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत नवरगाव परिसरात सर्वत्र खुलेआम दारु मिळत असल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच ढवळून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.