आठ दिवसात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:52+5:302021-01-15T04:23:52+5:30
राजुरा : राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील युवा शेतकरी प्रभाकर बापूजी वैद्य (३३) याने आपल्या शेतात विष प्राशन करून ...

आठ दिवसात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
राजुरा : राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील युवा शेतकरी प्रभाकर बापूजी वैद्य (३३) याने आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. राजुरा तालुक्यात आठ दिवसात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
मृत प्रभाकर यांच्यावर कर्ज होते. यावर्षी चांगले पीक आल्यास कर्जातून मुक्त होऊ, असा त्यांना विश्वास होता. आपल्या नातेवाईक व मित्रांना त्याने तसे बोलूनही दाखविले होते. परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व नापिकीमुळे प्रभाकर हादरून गेला. अनेक दिवसांपासून तो त्याच विचारात अस्वस्थ होता. अखेर शेतात जाऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. या दुर्दैवी घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यात गेल्या आठ दिवसात झालेली ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.