शिक्षकाविना शैक्षणिक कार्य खोळंबले
By Admin | Updated: July 29, 2014 23:43 IST2014-07-29T23:43:27+5:302014-07-29T23:43:27+5:30
गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानाची महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने यावर्षीपासून अंमलबजावणी (वर्गवाढ) केली असली तरी मात्र याचा विद्यार्थ्यांना फटका सहन करावा

शिक्षकाविना शैक्षणिक कार्य खोळंबले
विद्यार्थ्यांचे नुकसान : प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे
जिवती : गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानाची महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने यावर्षीपासून अंमलबजावणी (वर्गवाढ) केली असली तरी मात्र याचा विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागत आहे. शाळा सुरू होऊन महिना लोटला. परंतु वाढीव वर्ग ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षक मिळालेले नाहीत. त्यामुळ ेया सर्व शिक्षा अभियानाची झळ विद्यार्थ्यांची तारांबळ उडवित आहे. अनेक शाळेत त्याच शिक्षकांना वाढलेले वर्ग सांभाळावे लागल्याने त्यांनाही मरमर करुन अध्यापणाचे काम करावे लागत आहे.
यावर्षीपासून जिथे १ ते ४ वर्ग असतील, तिथे ५ वा वर्ग देण्यात आला. आणि जिथे १ ते ७ वर्ग आहेत, त्याठिकाणी ८ वा वर्ग देण्यात आला. १ ते ५ प्राथमिक गटात तर ६ ते ८ वा वर्ग उच्च प्राथमिक गटात मोडला जात आहे. यानुसार मोठ्या खेड्यांपासून तर लहाणातल्या लहान खेड्यातल्या शाळांना हे वर्ग वाढविण्यात आले. शासनाचा हा चांगला हेतु असला तरी या शाळांत वाढीव शिक्षकांचे समायोजन न केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व गुणात्मक दर्जा कसा सुधारेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अपवाद वगळता अनेक गावात वर्ग ५ वा वर्ग ८ वा देण्यात आला, हे सत्य असले तरी याठिकाणी शिक्षक पाठवल्या गेले नाहीत. जे आहेत त्याच एक - दोन शिक्षकांना वर्ग सांभाळावे लागत आहे. जरी विद्यार्थी संख्येवर जादा शिक्षक देण्यात येत असले तरी कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळेवरही ५ वा वर्ग देण्यात आल्याने ज्यादा तासिकांचा भर याच शिक्षकांना सोसावा लागत आहे. दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना चुपचाप बसून राहावे लागत असते, हे शिक्षण विभागाला समजून घ्यावे लागेल.
ज्या शाळेवर वर्ग ८ वा देण्यात आला, त्याही शाळेची हिच गत आहे. वर्ग देण्यात तर आला पण याठिकाणी पदविधर शिक्षकांची संख्या अर्धीे आहे. या ठिकाणी कमीतकमी तीन पदविधर शिक्षक हवेत, पण आजच्या स्थितीत एकाही ठिकाणी पदवीधर शिक्षक भरलेले नाहीत. गेल्या महिनाभरापासून बदल्यांचा घोळ सुरुच आहे. पण विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न पालकवर्गात चिंतेचा विषय आहे. जिल्ह्यात अंदाजे चारशे ते साडेचारशे शिक्षक पदव्या (बी.एड.) प्राप्त असताना त्याचे समायोजन का करत नाही. केवळ २३५ उच्च श्रेणी मुख्याध्यापक व त्यांच्यातूनच उर्वरित ज्येष्ठ शिक्षकांना पदवीधर म्हणून समायोजन केले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना रुजू केलेले नाही.याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. (शहर प्रतिनिधी