इको-प्रो ला इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:06+5:302021-02-05T07:42:06+5:30
चंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने देण्यात येणारा इंदिरा गांधी स्मृती विशेष पुरस्कार इको-प्रो संस्थेला इंदिरा ...

इको-प्रो ला इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कार
चंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने देण्यात येणारा इंदिरा गांधी स्मृती विशेष पुरस्कार इको-प्रो संस्थेला इंदिरा गांधी पुतळा परिसरात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी खा. नरेश पुगलिया होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरु विजय आईंचवार, हृदयरोग तज्ज्ञ डाॅ.अशोक वासलवार, डाॅ. महावीर सोईतकर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांना १ लाख ११ हजार १११ रुपये रोख, सन्मानपत्र, शाल तसेच श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी खा. नरेश पुगलिया यांनी इंदिरा गांधी या आमच्या आदर्श त्यांच्या विचारांच्या व कार्याच्या प्रेरणेने आम्ही काम करीत असल्याचे सांगितले. हा पुरस्कार इको प्रो ला देण्यात आला. संस्थेचे बंडू धोतरे यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून सेवाभावी तसेच देशविकासाचे उपक्रम राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन गजानन गावंडे गुरुजी, आभार अनिल तुंगीडवार यांनी मानले. यावेळी राहुल पुगलिया, अशोक नागापूरे, देवेंद्र बेले, विना खनके, स्वप्नील तिवारी, महेंद्र जयस्वाल, अरुण बुरडकर, सुधाकरसिंह गौर, रामदास वाग्दरकर, हरीहर भांडवलकर, गजानन दिवसे आदींची यावेळी उपस्थिती होती.