पर्यटन-हेरिटेज वॉकसाठी इको-प्रोची किल्ला स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:50+5:302021-01-01T04:19:50+5:30
१ मार्च २०१७ पासून ते मार्च २०२० पर्यंत नियमित इको-प्रो संस्थेच्या सदस्यांनी ९०० दिवस श्रमदान करून अभियान राबविले. ...

पर्यटन-हेरिटेज वॉकसाठी इको-प्रोची किल्ला स्वच्छता मोहीम
१ मार्च २०१७ पासून ते मार्च २०२० पर्यंत नियमित इको-प्रो संस्थेच्या सदस्यांनी ९०० दिवस श्रमदान करून अभियान राबविले. यावर्षी कोरोनामुळे स्वच्छता अभियान बंद करण्यात आले. सोबतच मागील दोन वर्षांपासून इको-प्रो संस्थेने पुढाकार घेत चंद्रपूर शहरातील ‘किल्ला पर्यटन - हेरिटेज वॉक’ सुरू केले. चंद्रपूरकर नागरिकांसह अन्य शहरांतूनसुद्धा पर्यटक या किल्ल्यावर आले. गोंडकालीन इतिहास, शहरातील अन्य ऐतिहासिक स्मारकाबाबत माहिती जाणून घेतली. मात्र, कोरोना काळात किल्ला पर्यटनसुद्धा बंद पडले. या वर्षभरात पावसाळ्यानंतर किल्ला परकोटवर झुडपे वाढली. पर्यटन सुरू करण्यास मार्गाची स्वच्छता आवश्यक असल्याने इको-प्रो सदस्यांनी २१ डिसेंबरपासून बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिरपर्यंत स्वच्छता अभियान सुरू केले. बुरुज ४, ५ व ६ व यामधील पादचारी मार्गांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात ७, ८ व ९ व पादचारी मार्गांची स्वच्छता पूर्ण झाल्यावर किल्ला पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन रामटेके, संजय सब्बनवार, राजू काहिलकर, प्रदत्ता सरोदे, अरुण गोवरदीपे, राजू भिवधरे, मनीषा जयस्वाल, जयेश बैनलवार, अभय अमृतकर, स्वप्निल रागीट, अब्दुल जावेद, सचिन धोतरे परिश्रम घेत आहेत.