भूकंपाचा नव्हे, भूस्खलनाचा धोका

By Admin | Updated: April 29, 2015 01:02 IST2015-04-29T01:02:26+5:302015-04-29T01:02:26+5:30

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने चंद्रपुरातील इमारती हादरल्या खऱ्या, मात्र प्रत्यक्षात चंद्रपूरला भूकंपाचा नव्हे तर भूस्खलनाचा धोका अधिक आहे.

Earthquake risk, not earthquake | भूकंपाचा नव्हे, भूस्खलनाचा धोका

भूकंपाचा नव्हे, भूस्खलनाचा धोका

संतोष कुंडकर  चंद्रपूर
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने चंद्रपुरातील इमारती हादरल्या खऱ्या, मात्र प्रत्यक्षात चंद्रपूरला भूकंपाचा नव्हे तर भूस्खलनाचा धोका अधिक आहे.
कोळसा खाणींनी वेढलेल्या चंद्रपूर शहराच्या चहुबाजूने वेकोलिने जमिन पोखरून ठेवली. मात्र नियमानुसार त्यात रेती भरण्यातच आली नाही आणि अजुनही ती भरल्या जात नसल्याने चंद्रपूर शहरावर भूस्खलनाचे संकट घोंगावत आहे. याविषयात पर्यावरणवाद्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याची आजवर दखलच घेण्यात आली नाही. याविषयात वेकोलिकडून केवळ कागदोपत्री रेती भरण्याची अंमलबजावणी करण्यात येऊन संबंधित अधिकारी लाखो रुपयांचा निधी परस्पर गिळंकृत करीत असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.
शनिवारी नेपाळमध्ये भूकंप झाला. तो इतका भीषण होता की, त्याचे दुष्परिणाम चंद्रपूर शहरापर्यंत जाणवले. शहरातील अनेक इमारती हलल्या. त्यामुळे नागरिक भयभित झालेत. असे असले तरी प्रत्यक्षात चंद्रपूर शहर किंवा जिल्ह्यात भूकंप केंद्र कुठेच नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर अथवा जिल्ह्याला भूकंपाचा धोका नसला तरी कोळसा खाण क्षेत्रात मात्र भूस्खलनाची शक्यता अधिक आहे. अशा घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. वणी (जि.यवतमाळ) तालुक्यात बोरगाव येथे २००९ मध्ये भूस्खलनाची मोठी घटना घडली होती.
१ १२ भूमिगत खाणी
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३६ खाणी असून त्यांपैकी १२ भूमिगत कोळसा खाणी आहेत. त्यांपैकी दुर्गापूर कोळसा खाण, डीआरसी खाण, बल्लारपूर येथील भूमिगत कोळसा खाण अशा भूमिगत खाणी आहेत. या १२ कोळसा खाणीतून आजवर करोडो रुपये किंमतीच्या कोळशाचे उत्खनन करण्यात आले. मात्र नियमानुसार त्यात रेती भरण्यात आली नसल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे.
४ नोटीस देऊन प्रशासन मोकळे

वेकोलिने उभ्या केलेले मातीचे धोकादायक ढिगारे हटविण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील पर्यावरणवादी संघटना शासनाशी संघर्ष करीत आहेत. अलिकडे मागणी लक्षात घेऊन ढिगारे उचलण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला नोटीस बजावली खरी; परंतु नोटीसचे पुढे काय झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 

Web Title: Earthquake risk, not earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.