वर्षभरात बिबट्याने घेतला पाच जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:47+5:30
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच ११ जानेवारीला बिबट्याने अभिमन्यु सिंह नामक व्यक्तीला जखमी केले. त्या पाठोपाठ १७ जानेवारीला मनोज दुर्योधन याला ठार केले. १६ फेब्रुवारीला नरेश सोनवणे याला ठार केले. २७ सप्टेंबर रोजी जोगेश्वर रत्नपारखी या इसमाला ठार केले. ७ ऑक्टोबर रोजी बबलू सिंह नामक युवकाला ठार केले. ११ नोव्हेंबर रोजी अनिल मुंजमकार याला ठार केले. ११ डिसेंबरला एजाज खान पठाण याला बिबट्याने जखमी केले.

वर्षभरात बिबट्याने घेतला पाच जणांचा बळी
अजिंक्य वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : वेकोलि दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीच्या परिसरात २०२१ या वर्षभरात बिबट्याने पाच लोकांचा बळी घेत दोन लोकांना जखमी केले. याशिवाय पट्टेदार वाघ रानडुक्कर, अस्वलाच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याची नोंद आहे, विशेष उल्लेखनीय. हे वर्ष बिबट व वाघाच्या हल्ल्याने गाजले आहे.
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच ११ जानेवारीला बिबट्याने अभिमन्यु सिंह नामक व्यक्तीला जखमी केले. त्या पाठोपाठ १७ जानेवारीला मनोज दुर्योधन याला ठार केले. १६ फेब्रुवारीला नरेश सोनवणे याला ठार केले. २७ सप्टेंबर रोजी जोगेश्वर रत्नपारखी या इसमाला ठार केले. ७ ऑक्टोबर रोजी बबलू सिंह नामक युवकाला ठार केले. ११ नोव्हेंबर रोजी अनिल मुंजमकार याला ठार केले. ११ डिसेंबरला एजाज खान पठाण याला बिबट्याने जखमी केले. या वर्षभरात बिबट्याने पाच लोकांचा बळी घेत दोन लोकांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय २ डिसेंबर रोजी ऊर्जानगर परिसरात पट्टेदार वाघाने रुपेश लांडे याला जखमी केल्याची घटना घडली आहे. १९ जुलै रोजी सरिता चिंचोले या महिलेस रानडुकराने जखमी केले आहे, तसेच २६ जुलै रोजी भटाळी येथील प्रमोद खिरवटकर याला अस्वलाने जखमी केल्याची घटना घडली आहे. हे वर्ष बिबट व वाघाच्या हल्ल्याने गाजले आहे. येथे पट्टेदार वाघ व बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या परिसरात वर्षभरात वाघाने मनुष्यास ठार केल्याच्या, जखमी केल्याच्या तसेच वाघ दिसल्याच्याच सर्वत्र चर्चा होत्या. दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीत २४ तास कोळसा उत्पादनाची प्रक्रिया सुरू असते. येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना वाघ व बिबट्यांचा अधिकच धोका आहे. सरत्या वर्षात घडलेल्या घटनांची येणाऱ्या नवीन वर्षात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वाघांचा बंदोबस्त करणे काळाची गरज आहे.