आक्सापुरात जादूटोण्यावरून गावकऱ्यांत संशयकल्लोळ

By Admin | Updated: December 17, 2015 01:13 IST2015-12-17T01:13:54+5:302015-12-17T01:13:54+5:30

कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आक्सापूर येथे मांत्रिकाने जादूटोणा करून गावातील इसमांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

Due to witchcraft in Aaksapur, the villagers have been scared | आक्सापुरात जादूटोण्यावरून गावकऱ्यांत संशयकल्लोळ

आक्सापुरात जादूटोण्यावरून गावकऱ्यांत संशयकल्लोळ

कोठारी : कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आक्सापूर येथे मांत्रिकाने जादूटोणा करून गावातील इसमांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जादू-करणी केल्यामुळेच गावातील तिघांचा मृत्यू झाला, असा कयास गावकऱ्यांनी लावला व गावातील वातावरण गढूळ झाले. करणी करण्याचा संशय असलेले कुटूंब व ज्यांचा जादूवर विश्वास आहे, असे गावकरी एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे आक्सापुरात सद्या जादूटोण्याच्या वादावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. गावकरी भयग्रस्त असून पोलीस ठाण्यात येवून आपबिती कथन करीत आहेत.
मागील महिनाभरापासून आक्सापुरात वेगवेगळ्या कारणाने तीन इसमांचा मृत्यू झाला. अचानक गावात मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने गावकरी भयभीत झाले. त्यात काही गावकऱ्यांना मृत्यूचे कारण जादू-करणी असल्याचा प्रकार एका मांत्रिकाने सांगितला. गावकऱ्यांनी त्यावर विश्वास करीत भांडणाला सुरूवात केली. त्यात एकमेकांवर आरोप करीत मारपीठ केली.
या प्रकाराची माहिती कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी दिली. ठाणेदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलाविले. गावातील तथाकथित मंडळी व प्रतिष्ठीतांची सर्व गावकऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली.
त्यात कोठारी येथील जादूचे प्रयोग करणारे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता जुनघरे मामा व ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी उपस्थित गावकऱ्यांना अंधश्रध्देबाबत मार्गदर्शन केले.
जुनघरे यांनी विविध प्रयोग सादर करून गावकऱ्यांच्या मनात असलेले भयग्रस्त वातावरण व भ्रामक कल्पनांना उजाळा देत सखोल मार्गदर्शन केले.
यापुढे आक्सापुरात अंधश्रद्धा निर्मुलनाच्या तज्ञांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून गावकऱ्यांच्या मनातील भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी प्रबोधन केल्या जाईल असे सांगितले.
ठाणेदाराच्या समयसुचकतेने आक्सापुरात उद्भवणाऱ्या प्रसंगावर वेळीच उपाय करण्यात यश मिळाले आहे. यापुढे गावात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतल्या जात असून नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)

Web Title: Due to witchcraft in Aaksapur, the villagers have been scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.