सिलिंडरच्या गोडावूनमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:29 IST2018-08-14T22:28:45+5:302018-08-14T22:29:00+5:30
शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस सिलिंडरचे गोडावून आहेत. मात्र त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. परिणामी हे सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.

सिलिंडरच्या गोडावूनमुळे धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस सिलिंडरचे गोडावून आहेत. मात्र त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. परिणामी हे सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
शहरातील रामनगर, गंजवार्ड, आणि टिळक मैदानात असलेले गॅस सिलिंडरचे गोडाऊन हे मागील कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवून सिलिंडरचे वितरण केले जाते. टिळक मैदानात असलेल्या गोडावूनच्या बाजूला मिठाईचे दुकान आहे. त्याठिकाणी रोज स्टोव्हच्या माध्यमातून नवनवीन पक्वान्न काढण्याचे काम सुरु असते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ही बाब मनसे पदाधिकाºयांनाी जिल्हाधिकाºयांना सांगितली.
ज्यावेळी शहरात सिलिंडरचे गोडाऊन तयार झाले. त्यावेळस हा भाग मोकळा होता. मात्र आता चारही बाजूने शहर वाढले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील गॅस सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलवावे, अशी मागणी निवेदनातून केली. निवेदन देणाºया शिष्टमंडळात मनसे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, भरत गुप्ता, मनोज तांबेकर उपस्थित होते.