शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे डाहुले गुरूजींचे उपोषण स्थगित
By Admin | Updated: September 6, 2015 00:55 IST2015-09-06T00:55:17+5:302015-09-06T00:55:17+5:30
निवड वेतन श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना त्यांच्या हक्काची रक्कम न मिळाल्याने आणि जिल्हा परिषदेच्या ...

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे डाहुले गुरूजींचे उपोषण स्थगित
चंद्रपूर : निवड वेतन श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना त्यांच्या हक्काची रक्कम न मिळाल्याने आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याद्याही न तयार केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार रमेश डाहुले गुरूजी यांनी दिलेला बेमुदत उपोषणाचा इशारा तुर्तास मागे घेतला आहे.
या मागणीसाठी शिक्षकदिनापासून बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यान, ४ सप्टेंबरला शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी दखल घेवून तातडीची बैठक बोलाविली. बैठकीत ८ सप्टेंबरपर्यंत सर्व याद्या सेवाज्येष्ठतेनुसार तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले. बैठकीत ठरल्यानुसार, या याद्यांवर पुढील सात दिवसात आक्षेप मागविले जाणार आहेत. त्यानंतर पुढील १५ दिवसांनी सर्व माहिती संकलित करून यादीच्या २० टक्के शिक्षकांना लाभ देण्याचे ठरले आहे. या बैठकीला रमेश डाहुुले यांच्यासह सदाशिव तेलंग, जी.एम. वरघणे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)