पावसाअभावी उभे पिके करपू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:00 IST2017-08-04T00:00:22+5:302017-08-04T00:00:53+5:30
पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

पावसाअभावी उभे पिके करपू लागले
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या कडक उन्ह तापत असल्याने उगवलेले पीक करपन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.
जून महिन्यात पावसाची सुरूवात तशी चांगलीच झाली. यावेळी शेतकºयांनी कशाचीही पर्वा न करता वेळेवर पेरण्या केल्या. जमिनीतून पीक उगवले, पण पावसाने नंतर जी दडी मारली, ती उभ्या पिकांचा बळी घेतल्यानंतरच येईल, असेच चिन्ह दिसून येत आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसरात कापसाचे पीक एवढे बहरून आले आहे की, ते बघितल्यानंतर येणारी दिवाळी शेतकºयांसाठी चांगली जाईल, असे दिसून येते. मात्र दडी मारलेल्या पावसाने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
धान पºहे करपली, शेतकºयांची धडधड वाढली
तळोधी (बा) : अपुºया पावसामुळे रोवणीचे कामे पूर्णपणे खोळंबली असून धान पºहे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तळोधी (बा) येथील सामाजिक कार्यकर्ते बल्लू गेटकर यांनी केली आहे. या भागातील शेतकरी वर्ग पूर्णपणे धान पिकावर अवलंबून असून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या भागातील घोडाझरी तलावात केवळ ३२.१८ टक्के जलसाठा असून नदी-नाले, बोड्या सुद्धा पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. काही शेतकºयांनी विहीर, बोरवेलच्या पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र रोवणीचे पीक करपून गेले आहे.
उन्हाचा तडाखा
राजुरा : बºयाच दिवसापासून पावसाने दडी मारली असून सूर्यनारायण मात्र तापत आहे. त्यामुळे शेतातील ओलावा सुकून गेला आहे. शेतातील कापूस व सोयाबीनचे रोपे कोमेजून जात असून ओलिताची सोय नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. महागडे बी-बियाणे व खत खरेदी करून पेरणी केली. पावसाने सुरवातीस योग्य साथ दिली. शेतकºयांनी मशागत करून रोपाची वाढ केली. परंतु, अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे ओलावा सुकुन गेला असून आता पाऊस आवश्यक आहे.