शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'प्राधिकृत अधिकारी' नेमण्यासाठी डॉ. रवींद्रपाल सिंगने सरकारला लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:50 IST

Chandrapur : नागभीडातून सुरू झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील तपासाला कायद्याची ढाल लावून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी डॉक्टरांना घेरण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आता रणनीती बदलली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीडातून सुरू झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील तपासाला कायद्याची ढाल लावून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी डॉक्टरांना घेरण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आता रणनीती बदलली आहे. 'थोटा' (THOTA) कायद्याचा तांत्रिक पेच निर्माण करून तपासात खोडा घालणाऱ्या डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या आव्हानानंतर, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी राज्य सरकारकडे एसआयटीला 'प्राधिकृत अधिकारी' नेमण्यासाठी शनिवारी विशेष पत्र पाठवले. या पत्रामुळे एसआयटीला या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कायदेशीर 'ब्रह्मास्त्र' मिळणार आहे.

त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या अटकेच्या हालचाली सुरू असतानाच, आरोपींच्या वकिलांनी 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा' (थोटा) मधील कलम २२ चा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. जोपर्यंत शासन नियुक्त प्राधिकरण तक्रार करत नाही, तोपर्यंत न्यायालयाला दखल घेता येणार नाही, तसेच पोलिसांना तपासही करता येत नाही असा दावा करण्यात आला. पोलिसांचे हात बांधण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी राज्य सरकारकडून तातडीने अधिकारांची मागणी केली आहे. पुढील ४८ तासांत हे अधिकार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

डॉ. सिंगपुढे पोलिसांची ५५ प्रश्नांची लेखी प्रश्नावली

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवून डॉ. रवींद्रपाल सिंग चंद्रपूर तपासी अधिकाऱ्यांकडे दररोज हजेरी लावत आहे. मात्र, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला 'आय डोन्ट रिमेंबर' असे उत्तर देऊन ते वेळकाढूपणा करत आहेत. पोलिसांकडे आजपर्यंतच्या उपलब्ध पुराव्याबाबत तसेच मोबाईलधील डाटावरून ५५ प्रश्नांची एक प्रश्नावली तयार करून लेखी उत्तर मागितले आहे. यातही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची माहिती आहे. हा सर्व अहवाल पोलिस न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती आहे.

जामीन होताच 'त्या' सावकाराला पुन्हा बेड्या

  • रोशन कुळे प्रकरणात अटकेत असलेला सावकार लक्ष्मण उरकुडे याला जामीन मिळताच तो सुटकेचा निःश्वास टाकणार, तोच ब्रह्मपुरी पोलिसांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात उचलले.
  • राजकुमार बावणे यांच्याकडून आठ लाखांच्या बदल्यात तब्बल ३१ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप उरकुडेवर आहे. जामीन मिळून बाहेर येताच पुन्हा बेड्या पडल्याने सावकार गोटात खळबळ उडाली आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Singh's Letter Seeks 'Authorized Officer' Appointment in Kidney Scam Probe.

Web Summary : Chandrapur police seek government-appointed 'Authorized Officer' to overcome legal hurdles in the kidney transplant racket investigation involving Dr. Ravindrapal Singh. This move aims to empower the SIT to effectively expose the illegal network after Dr. Singh challenged the investigation, citing legal technicalities. A loan shark was re-arrested after getting bail.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी