Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना रुग्णाची माहिती दडवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विनोद नगराळेविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:58 IST2020-04-02T19:58:21+5:302020-04-02T19:58:48+5:30
कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यां संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली.

Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना रुग्णाची माहिती दडवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विनोद नगराळेविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यां संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली. याप्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खेरा यांचा तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लाकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठी खबरदारी घेतली जात आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाईया रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला होता.
डॉ. नगराळे यांच्याकडे रहेमतनगर येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. या रुग्णावर उपचार करून सुटका करण्यात आली. त्यानंतर काही दिवसात त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेनंतर डॉ. नगराळे यांनी संबंधित रुग्णाची माहिती प्रशासनाला दिली नसल्याचे समोर आले. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली. वैद्यकीय अधिकाड्ढयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 188, 269, 270 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बहादुरे यांनी दिली.