डॉ. राजन जयस्वाल यांना पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST2021-09-25T04:30:18+5:302021-09-25T04:30:18+5:30

नागभीड (चंद्रपूर) : प्रख्यात कवी, चारोळीकार आणि समीक्षक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांना डॉ. गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीने दिला ...

Dr. Award announced to Rajan Jaiswal | डॉ. राजन जयस्वाल यांना पुरस्कार जाहीर

डॉ. राजन जयस्वाल यांना पुरस्कार जाहीर

नागभीड (चंद्रपूर) : प्रख्यात कवी, चारोळीकार आणि समीक्षक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांना डॉ. गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा स्व. मल्हारराव काळे स्मृती समीक्षा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा २६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात होणार आहे. अ. भा. साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. रोख पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. जयस्वाल यांच्यासोबतच डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. सतीश पावडे, प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचीही याच फाउंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या अन्य पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

Web Title: Dr. Award announced to Rajan Jaiswal