रेल्वे परीक्षा द्यायची की एमपीएससीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:12+5:302021-03-18T04:27:12+5:30
जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो युवक आहेत. अनेक युवक नागपूर, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावून ...

रेल्वे परीक्षा द्यायची की एमपीएससीची?
जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो युवक आहेत. अनेक युवक नागपूर, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावून अभ्यास करीत आहेत. जाहिरातीनुसार एमपीएससीची परीक्षा ५ एप्रिलला होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनामुळे तसेच आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ही परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. मुलांनी आक्रोश केल्यानंतर अखेर २१ मार्च रोजी परीक्षा जाहीर करण्यात आली. परंतु, मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या रेल्वे विभागाच्या परीक्षेचा पेपर रविवारी होणार आहे. परंतु, या दोन्ही परीक्षा देणारे अनेक युवक आहेत. एकाच दिवशी दोन्ही पेपर असल्याने अनेक विद्यार्थ्यांना एका पेपरला मुकावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेचा पेपर द्यायचा की एमपीएससीचा? अशा द्विधा मन:स्थितीत युवक अडकले आहेत.
बॉक्स
रेल्वेची परीक्षा ऑनलाइन
रेल्वे विभागाची परीक्षा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससीच्या लांबलेल्या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी वैफल्यग्रस्त झाल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे.