शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बरखास्त करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारनी रचना केली. मात्र, सद्यास्थितीत बाजार समित्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळवण्यासाठी त्या उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) प्रभाविपणे राबविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्दे बाजार समितीची मागणी : निवेदनातून वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने लागू केलेली ई-नाम ही अत्यंत चांगली योजना आहे. परंतु, यामध्ये अजूनही बऱ्याच त्रुटी आहे. तसेच सर्वप्रथम बाजार समितीची रचना व अडचणीसुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने बाजार समित्या संपुष्टात आणू नये, अशी मागणी चंद्रपूर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांंमार्फत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पाठविलेल्या निवेदनातून केली.शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारनी रचना केली. मात्र, सद्यास्थितीत बाजार समित्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळवण्यासाठी त्या उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) प्रभाविपणे राबविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या पातळीवर स्वीकार केला आहे. विविध राज्यांच्या माहितीच्या संकलनातून केंद्र शासन, बाजार समितीचा कायदा संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, शासनाने सुरू केलेल्या ई-नाम योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. ई-नाम योजनेचा उद्देश चांगला असला तरी तो किचकट स्वरुपाची आहे. त्यामुळे ई-नाम योजना एकाचवेळी सर्व बाजार समित्यांना बंधनकारक असावी तेव्हाच त्याची अंमलबजावणी शक्य आहे. अन्यथा ज्या बाजार समितीमध्ये ई-नाम योजना नाही तिथे जाण्याचा कल शेतकºयांचा अधिक आहे.परिणामी ज्या बाजार समितीतून ई-नाम योजना राबविण्यात येत आहे त्या बाजार समितीची शेतमाल आवक कमी होऊन उत्पन्नात घट झालेली आहे. या सर्व अडचणीमुळे बाजार समित्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य व केंद्र शासनाने उपलब्ध करुन द्यावा, त्या बरखास्त करु नये अशी मागणी चंद्रपूर बाजार समितीच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाºया शिष्टमंडळानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, वरोराचे सभापती विशाल बदखल, चिमूरचे माधव बिरजे, गोंडपिपरीचे सुरेश चौधरी, भद्रावतीचे वासुदेव ठाकरे, राजुराचे कवडू पोटे, उपसभापती रंजीत डवरे, समितीचे संचालक नीरज बोंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Marketबाजारcollectorजिल्हाधिकारी