ध्वजनिधी संकलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
By Admin | Updated: January 23, 2016 01:04 IST2016-01-23T01:04:24+5:302016-01-23T01:04:24+5:30
ध्वजदिन निधी २०१४ च्या संकलनासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यास ३० लक्ष ८० हजार रूपये उदिष्ट दिले होते.

ध्वजनिधी संकलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
चंद्रपूर : ध्वजदिन निधी २०१४ च्या संकलनासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यास ३० लक्ष ८० हजार रूपये उदिष्ट दिले होते. यात जिल्ह्याने ३१ लक्ष ८५ हजार रूपयाचा निधी संकलीत केला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, चंद्रपूर व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांचा गौरव प्रजासत्ताक दिनी केला जाणार आहे.
सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह २६ जानेवारी रोजी आयोजित प्रजासत्ताक दिन समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात गौरव करण्यात येणार आहे. लिमसे यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचा पुरस्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने स्वीकारणार आहेत. युध्द क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आत्मबलिदान करून वीरगती लाभलेल्या लष्करातील जवानांच्या कुटुंबियांना, अवलंबितांचे पुनर्वसन करण्यासाठी निधीची गरज पडते. तो ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेकडून गोळा केल्या जाते. या निधीचा संकलन शुभारंभ दरवर्षी ७ डिसेंबर रोजी केला जातो. युध्दक्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहिद झालेले, अपंगत्व प्राप्त झालेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी महाराष्ट्र शासन या निधीतून विविध कल्याणकारी योजना राबवित असते. (स्थानिक प्रतिनिधी)