जिल्ह्यात १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:47+5:30

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईड व दूषित पाण्याचे प्रमाण किती, याचे निकष ठरविण्यात आले आहेत.

In the district, 193 water samples infect fluoride | जिल्ह्यात १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित

जिल्ह्यात १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित

ठळक मुद्देप्रयोगशाळेचा अहवाल। चिमूर तालुक्यात सर्वाधिक नमुने दूषित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत जानेवारी २०२० रोजी तपासणी केलेल्या ४ हजार २४० पाणी नमुन्यांपैकी १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहेत.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईड व दूषित पाण्याचे प्रमाण किती, याचे निकष ठरविण्यात आले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील तपासलेल्या ५६ पाणी नमुन्यांपैकी ५ फ्लोराईड बाधित नमुने आढळले आहे. बल्लारपूर तालुक्यात ७० पैकी ५, राजुरा तालुक्यात ३२६ पैकी १८, कोरपना ३७८ पैकी १०, भद्रावतीत १८१ पैकी १४ नमुने फ्लोराईड बाधित आढळून आले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात ४१२, नागभीड ८४, गोंडपिंपरी येथील ३४८ पाणी नमुन्यांपैकी सर्वच पाणी पिण्यायोग्य तर पोंभुर्णा तालुक्यामधील २८२ पैकी ८ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहेत.
वरोरा तालुक्यात ५०३ पाणी नमुने तपासल्यानंतर ४० पाणी नमुने फ्लोराईड बाधित, चिमूर तालुक्यात ४५७ पैकी ३५, सावली ३६९ पैकी १७, मूल येथे ४०२ पाणी नमुने तपासल्यानंतर ३६ नमुने तर सिंदेवाहीत ३७२ पैकी १४ फ्लोराईड बाधित पाणी नमुने आढळले. दूषित नमुन्यांची टक्केवारी ४.५५ टक्के आहे.

दूषित नमुन्यांची टक्केवारी ४.५५
फ्लोराईडबाधित पाण्याची तपासणी केल्यानंतर जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून अशा स्त्रोतांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. दूषित नमुन्यांची टक्केवारी ४.५५ टक्के असून ती वाढणार नाही, यासाठी उपाययोजना सुरू आहे.

Web Title: In the district, 193 water samples infect fluoride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.