चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात सुरक्षितता प्रोत्साहन प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST2021-02-21T04:52:57+5:302021-02-21T04:52:57+5:30

दुर्गापूर : आठव्या संचाच्या देखभाल-दुरुस्तीत एकही अपघात होऊ न देता सुरक्षिततेने काम पूर्ण केल्याबद्दल चंद्रपूर वीज केंद्राच्या मुख्य ...

Distribution of Safety Promotion Certificate at Chandrapur Thermal Power Station | चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात सुरक्षितता प्रोत्साहन प्रमाणपत्राचे वितरण

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात सुरक्षितता प्रोत्साहन प्रमाणपत्राचे वितरण

दुर्गापूर : आठव्या संचाच्या देखभाल-दुरुस्तीत एकही अपघात होऊ न देता सुरक्षिततेने काम पूर्ण केल्याबद्दल चंद्रपूर वीज केंद्राच्या मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या हस्ते अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांना एका कार्यक्रमात सुरक्षितता प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

वीज केंद्रातील संच क्र. ८ चे २० डिसेंबर ते २४ जानेवारीदरम्यान देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. या कालावधीत काम पूर्ण करण्यासोबतच अपघात घडू न देण्याचा अथवा अपघातप्रवण परिस्थिती उत्पन्न होऊ न देण्याची जबाबदारी असते. यादृष्टीने सर्व कार्याची सुरक्षितपणे आखणी करून कार्य सुरक्षितपणे पार पडेल, याची सर्व अधिकारी, विभागप्रमुख, अभियंते, कर्मचारी, सुरक्षा विभाग व सुरक्षितता सदस्य, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांनी काळजी घेतली व देखभालीचे काम पूर्णत्वास नेले. सुरक्षितता विभागानेही या कामात शून्य अपघाताचे उद्दिष्ट ठेवले होते. एकूणच सर्वांचे एकत्रित प्रयत्न यशस्वी होऊन एकही अपघात न घडता वार्षिक देखभालीचे काम पूर्ण झाले.

अशा सर्वांना प्रोत्साहित करण्याकरिता मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली येथील स्पार्क सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता (प्रभारी) मदन अहिरकर, अधीक्षक अभियंता अनिल गंधे, संजय तायडे यांच्या हस्ते संबंधितांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाकरिता संचालन सेवा-३ व सुरक्षितता विभाग यांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Distribution of Safety Promotion Certificate at Chandrapur Thermal Power Station