वलनी येथे नवीन रेशनकार्डचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:07+5:302021-04-02T04:29:07+5:30

सावरगाव : नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत वलनी अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. ३ मधील भटक्या (गोसावी) जमातीच्या कुटुंबांना रेशनकार्डचे वितरण ...

Distribution of new ration cards at Valani | वलनी येथे नवीन रेशनकार्डचे वितरण

वलनी येथे नवीन रेशनकार्डचे वितरण

सावरगाव : नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत वलनी अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. ३ मधील भटक्या (गोसावी) जमातीच्या कुटुंबांना रेशनकार्डचे वितरण करण्यात आले.

वलनी येथे गोसावी समाजाचे अनेक कुटुंब गेल्या २० वर्षांपासून राहत आहेत. मात्र रेशनकार्ड नसल्यामुळे शासकीय योजनेचा कुठलाही लाभ व रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य होमदेव मेश्राम यांना सांगितले. त्यांनी तहसील कार्यालय नागभीड येथे संपूर्ण कागदपत्रे सादर करुन वलनी वार्ड क्र.३ मधील मालाबाई फुलगीर बारड, राखी साजन बारड,सावित्राबाई इंदल गुंधी यांना रेशन कार्ड मिळवून दिले व मंगळवारी नव्या रेशन कार्डचे वितरण करण्यात आले.

यावेळी नवीन रेशनकार्डचे वाटप करताना ग्रा. पं. सदस्य होमदेव मेश्राम, ग्रा. पं. सदस्य पिंकी दिलदार बारड, भागवत नरुके, दिलदार बारड, साजन बारड, देवा राठोड व अनेक गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Distribution of new ration cards at Valani