शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST2020-12-28T04:14:59+5:302020-12-28T04:14:59+5:30
चंद्रपूर : भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनीतर्फे आठ शेतकऱ्यांना शासनाच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून अनुदान तत्वावर ट्रॅक्टर, टिलर, पावर सप्रायर, पंप, ...

शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारांचे वितरण
चंद्रपूर : भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनीतर्फे आठ शेतकऱ्यांना शासनाच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून अनुदान तत्वावर ट्रॅक्टर, टिलर, पावर सप्रायर, पंप, रिपिअरचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या मदतीने व नवदृष्टी महिला विकास संस्था चंद्रपूरच्या सहकार्याने भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीमध्ये ३०० च्यावर शेतकरी भागदार आहेत. कंपनीतर्फे पात्र आठ शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर अवजारांचे वितरण करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अजिनाथ टेले, नवदृष्टी महिला विकास संस्थेचे संचालक निलेश देवतळे, भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष राजजीवन वाघमारे, कंपनीचे सीईओ संप्रज्ञ वाघमारे, माजी बँक व्यवस्थापक कासलवार, नवदृष्टी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अक्षय देशमुख, कंपनीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.