गरजवंतांना ब्लँकेटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:14+5:302021-01-16T04:32:14+5:30
सध्या आपल्या देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातलेले असताना पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मागील काही ...

गरजवंतांना ब्लँकेटचे वितरण
सध्या आपल्या देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातलेले असताना पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी आलेल्या कृत्रिम महापुरांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून घेतलेला आहे. यात कित्येक लोकांची घरे पडली तर कुणाची जनावरे वाहून गेली. खान्यापिण्याचे साहित्य वाहून गेले. अशी प्रचंड नैसर्गिक आपदा नदीकाठावरील गावांतील नागरिकांवर आलेली आहे.
अशा परिस्थितित खारीचा वाटा म्हणून ब्रह्मपुरी येथील इसाफ बँकेच्या वतीने गरजू लोकांना ब्लँकेट्सचे वितरण करण्यात आले. या वेळी विभागीय व्यवस्थापक महेंद्र सहारे, आशिष खवाडे, शाखा व्यवस्थापक जितेंद्र गुप्ता, बँक अधिकारी भाग्यश्री, अखिल मेश्राम आदी उपस्थित होते.