अल्ट्राटेक फाऊंडेशन द्वारा ६० संगणकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:53+5:302020-12-22T04:27:53+5:30
आवारपूर, बिबी, नांदा, पालगांव, नोकारी, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयगांव, हिरापूर व सांगोडा अशा १२ गावातील जिल्हा परिषद मराठी ...

अल्ट्राटेक फाऊंडेशन द्वारा ६० संगणकांचे वितरण
आवारपूर, बिबी, नांदा, पालगांव, नोकारी, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयगांव, हिरापूर व सांगोडा अशा १२ गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा तर जिल्हा परिषद तेलगु शाळा नांदा, जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी अशा एकूण १५ शाळांना एकूण ६० संगणक यंत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला संजय शर्मा, बी. पी. सग्गु, योगेश भट, देवांशू सिंन्हा व कर्नल दिपक डे आदी मान्यवर उपस्थित होते.
संगणकाचा स्वीकार करण्याकरिता आवारपूरच्या सरपंच सिंधु परचाके, बाखर्डीच्या सरपंच अल्का पायपरे, नोकारीचे सरपंच दशरथ नागतुरे नोकरी, हिरापूरचे प्रमोद कोडापे, सांगोडाचे सरपंच सचिन बोंढे, बिबीचे उपसरपंच आशिष देरकर, नांदाचे सरपंच गणेश पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांच्यासह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन संजय पेठकर यांनी केले तर आभार सचिन गोवारदीपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आय. टी. विभागाचे हेमंत होमकर, सी. एस. आर. विभागाचे संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी प्रयत्न केले.