जि. प. शाळांचे वीज बिल माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:46+5:302021-07-19T04:18:46+5:30
चंद्रपूर : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून तोकडी रक्कम मिळते. यामध्ये शाळांचे बिल बिल भरणे अशक्य ...

जि. प. शाळांचे वीज बिल माफ करा
चंद्रपूर : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून तोकडी रक्कम मिळते. यामध्ये शाळांचे बिल बिल भरणे अशक्य आहे. त्यामुळे शाळांचे वीज बिल जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमधून भरण्यात यावे किंवा पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी पुरोगामी शिक्षक समितीने केली आहे. यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
चंद्रपूर येथे आले असता शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मागणी केली. राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये ई लर्निंग, संगणक, टीव्हीची व्यवस्था आहे. त्यामुळे मासिक वीज बिल हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत येते. शाळांकडे पुरेसा निधी उपलब्ध नसतो. परिणामी अनेकवेळा वीजपुरवठा बंद होण्याची भीती असते. त्यामुळे प्राथमिक शाळांचे वीज बिल ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेने भरावे, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्यासह पदाधिकारी मनोज बेले, गणेश कागदेलवार, पंकज उद्धरवार, प्रशांत कावळे, श्रीकृष्ण लोनबले यांची उपस्थिती होती.