मागणीएवढा पुरवठा न झाल्यास कोरोना लसीकरणाला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:23+5:302021-03-31T04:28:23+5:30
जिल्ह्यातील ६९ केंद्रांवर मंगळवारपर्यंत एक लाख हजार ४ हजार ६२५ डोस घेणाºयांमध्ये पहिला डोस १६ हजार ९३६ हजार हेल्थ ...

मागणीएवढा पुरवठा न झाल्यास कोरोना लसीकरणाला खोडा
जिल्ह्यातील ६९ केंद्रांवर मंगळवारपर्यंत एक लाख हजार ४ हजार ६२५ डोस घेणाºयांमध्ये पहिला डोस १६ हजार ९३६ हजार हेल्थ केअर वर्कर, दुसरा डोज घेणारे १० हजार ८२५ फ्रन्ट लाईन वर्कर, ५६ हजार ६४ ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधींचा समावेश आहे. चंंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील आरोग्य विभागाचे केंद्र व खासगी हॉस्पिटल्स मिळून मंगळपर्यंत २४ हजार ६९६ जणांनी लस टोचून घेतली. यामध्ये १२ हजार २३४ व्यक्ती ६० वर्षे व ४५ वर्षांवरील सहव्याधी नागरिक आहेत. चंद्रपूर (ग्रामीण) तालुक्यातही ६ हजार ५४२ जणांची लस घेतली.
एक लाख १७ हजार डोसची मागणी
१ एप्रिलपासून १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूर मनपा क्षेत्र व जिल्हाभरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारपर्यंत सुमारे १३ हजार लसींचे डोस शिल्लक होते. जिल्हा आरोग्य प्रशासनाने एक लाख १७ हजार डोसची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ?
लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांची एकूण संख्या प्रशासनाने अद्याप जाहीर केली नाही. नोंदणी केलेले आरोग्यसेवक, फ्रन्ट लाईन वर्करचे लसीकरण उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील सहव्याधी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांवर लसीकरण लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.