शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या प्रदूषणावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:13 IST

चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचाराला धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास मागच्या वर्षी सुरुवात केली होती.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचाही सहभाग : आता सोशल मीडियावर नोंदविणार प्रदूषणाबाबत आपली मते

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचाराला धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास मागच्या वर्षी सुरुवात केली होती. शहरात तर वायु प्रदूषण नियंत्रणाबाबत खूप कार्यक्रम होत राहतात. पण स्टार रेटिंगसारखा उपक्रम, उद्योगांच्या सावलीत राहणाऱ्या चंद्रपूर शहरात कसा वापरला जाऊ शकतो, याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटी व शिकागो विद्यापीठाच्या एपिक-इंडिया या संस्थेने बजाज पॉलिटेक्निक महाविद्यालयात एक चर्चासत्र आयोजित केले होते.या चर्चासत्रात प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात एपिक इंडियाचे ईशान चौधरी व जे-पाल संस्थेचे आर्कोपाल दत्त व गार्गी पाल हेही उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक भरत बजाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य हरिनखेडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सुरेश विधाते, विजय कोयल, प्रा.गुंडावार आणि प्रा. भास्करवार उपस्थित होते.जवळपास ६० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात सहभाग घेवून प्रदूषणावर मात करीत चंद्रपूर शहराची हवा स्वच्छ ठेवण्याचा अट्टाहास धरला. या वेबसाईटवर व त्यांच्या सोशल मीडिया पेज वर आम्ही आमच्या शहराच्या प्रदूषणाची अवस्था फोटो किंवा व्हीडीओच्या माध्यमातून पोस्ट करून आमचा आवाज सरकारपर्यंत नेऊ शकतो, असे यावेळी अंकुश नावाचा विद्यार्थी म्हणाला. त्याला उपस्थित सर्वांनी प्रतिसाद दिला.स्टार रेटिंग कार्यक्रम म्हणजे काय ?महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्टार रेटिंग कार्यक्रम असून यात अंदाजे २० हजार औद्योगिक वायु उत्सर्जनाच्या नमुन्यांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकत आहे. या नवीन योजनेंतर्गत औद्योगिक संस्थांना त्यांच्या औद्योगिक वायू उत्सर्जनाच्या प्रमाणावरुन १ ते ५ तारांकन देण्यात आले आहे. १ तारांकन प्राप्त औद्योगिक संस्था ही जास्त प्रदूषणकारक म्हणजेच एमपीसीबी मान्यतांचे कमी पालन करणारी तर ५ तारांकन प्राप्त संस्था ही मान्यतांचे उत्तम पालन करणारी म्हणजेच अतिशय कमी प्रदूषणकारक संस्था असेल. औद्योगिक संस्था, शासन तसेच सामान्य जनतादेखील एमपीसीबी वेबसाईटवर जाऊन आपल्या विभागातील औद्योगिक संस्थांचे तारांकन पाहू शकतील. आपल्या विभागातील औद्योगिक संस्था सहज शोधण्यासाठी विभाग, क्षेत्र तसेच तारांकन या तीन विभागांचा आधारदेखील घेऊ शकतील.