शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पुरस्काराठी शिक्षकांचा निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी सत्कार केला जातो. यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांकडून प्रस्ताव मागितले आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रथम १२ आॅगस्टला पत्र काढून प्रस्ताव मागितले. मात्र पाहिजे त्या प्रमाणात अर्जच आले नसल्याने प्रशासनाने दोनवेळा मुदतवाढ दिली.

ठळक मुद्देशिक्षक दिनी होणार सत्कार : केवळ ३७ शिक्षकांनी पाठविले पुरस्कारासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षकांच्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेकडूनशिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. यासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती प्रस्तावाद्वारे घेऊन समितीद्वारे निवड करण्यात येते. मात्र पुरस्कारासाठी जिल्ह्यातील शिक्षक उदासीन असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातून केवळ ३७ शिक्षकांनीच पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक तालुक्यातून एक, हायस्कुल विभाग, अपंग, कला (संगीत) या विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड केली जाते.जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी सत्कार केला जातो. यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांकडून प्रस्ताव मागितले आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रथम १२ आॅगस्टला पत्र काढून प्रस्ताव मागितले. मात्र पाहिजे त्या प्रमाणात अर्जच आले नसल्याने प्रशासनाने दोनवेळा मुदतवाढ दिली. दरम्यान, आलेल्या ३७ अर्जाची छाननी करण्यात आली असून सोमवारी निवड समितीच्या माध्यमातून या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना समितीपुढे आपल्या कार्याचे सादरीकरण करावे लागणार आहे. या निवड समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती, मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य आदींचा समावेश आहे. पुरस्कारासाठी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल नसावा यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून प्रमाणपत्र असावे, शिक्षकांचे स्वत:चे हमीपत्र, मुख्यालयी राहत असल्याबाबत शाळा समिती समिती, गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, प्राथमिक शिक्षकांना १५ वर्ष पूर्ण व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना २० वर्ष सेवा पूर्ण होणे गरजेचे आहे. प्रस्तावावर पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांनी शिफारस आवश्यक आहे, शिक्षकांचीकोणतीही चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी, शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात कार्य केल्याबाबतची माहिती देणेही शिक्षकांना आवश्यक आहे.१७ शिक्षकांची होणार निवडप्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे १५ तालुक्यासाठी १५ शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल विभागातून १, अंपग कोट्यातून १ आणि कला, संगीत मधून एक अशा १७ शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.आठ महिला शिक्षकांचे अर्जजिल्ह्यातील आठ महिला शिक्षकांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर केले आहे. यामध्ये सिंदेवाही, ब्रह्मपुरी, भद्रावती, चंद्रपूर, गोंडपिपरी, वरोरा या तालुक्यातील महिला शिक्षकांचा समावेश आहे.आज होणार सादरीकरणशिक्षक पुरस्कारासाठी आलेल्या अर्जामधून छाननी करून सोमवारी या उमेदवारांचे समितीसमोर सादरीकरण करावे लागणार आहे.वेतनवाढही झाली बंदपूर्वी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना एक वेतनवाढ दिली जात होती. मात्र ही वेतनवाढ २०१८ पासून बंद करण्यात आली. त्यामुळेही काही शिक्षक या पुरस्काराकडे पाठ फिरवत आहे.पाच हजारांवर शिक्षकजिल्ह्यात पंधरातालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ५ हजारांवर शिक्षक आहे. यातून केवळ ३७ शिक्षकांनीच पुरस्कारासाठी अर्ज सादर केले आहे. शिक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.मुख्य कार्यपालन अधिकाºयांचा नवा पायंडापूर्वी पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाºया शिक्षकांच्या प्रस्तावावरील माहितीच्या आधारे समिती शिक्षकांचे नाव जाहीर करीत होते. मात्र मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाऱ्या शिक्षकांना बोलावून स्वत: समितीसमोर सादरीकरण करणे अनिवार्य केले आहे. यामुळे खºया अर्थाने शिक्षकांची निवड केली जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे अन्य मार्गाने पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकांना चांगलाच चाप मिळाला आहे.शिक्षकांत नाराजीजिल्हा परिषद दरवर्षी शिक्षकांकडून अर्ज मागून त्यामाध्यमातून पुरस्कारासाठी निवड करतात. जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यात प्रत्येक शिक्षकांच्या कामांची जंत्री असते. त्यामुळे यामाध्यमातून शिक्षकांची निवड केल्यास त्यांच्या कार्याचा खºया अर्थाने सन्मान होईल, असे मत काही शिक्षक व्यक्त करीत आहे.अर्ज सादर करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढतालुकानिहाय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र दरवर्षीपमाणे यावर्षीही शिक्षकांचा या पुरस्काराबाबत निरुत्साह बघायला मिळाला. जिल्हा परिषद प्रशासने प्रथम १२ ऑगस्ट रोजी प्रस्ताव सादर करण्याची तारीख दिली होती. मात्र अल्प प्रतिसाद बघता प्रशासनाने १८ ऑगस्टपर्यंत तारीख वाढवून दिली. त्यानंतरही शिक्षकांचा निरुत्साह होता. त्यामुळे पुन्हा प्रशासनाने २७ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत वाढ दिली.जिद्द न सोडता अर्ज सादरजिल्ह्यातील दोन महिला शिक्षकांनी यापूर्वीही पुरस्कारासाठी अर्ज सादर केले होते. मात्र त्यांचे नाव पुरस्कार समितीने बाद केले. यातील एका महिला शिक्षकाने दोन तर दुसऱ्या एका महिला शिक्षकाने सतत तिनवेळा पुरस्कारासाठी अर्ज सादर केले. मात्र त्यांची निवड झाली नाही. या महिला शिक्षकांनी आपला यावेळीही पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला असून यावेळी त्यांना पुरस्कार मिळतो की, यावेळीही बाद होते याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक