अर्धवट रस्त्याने प्रवाशांना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST2021-09-19T04:28:29+5:302021-09-19T04:28:29+5:30

चंद्रपूर : पडोली येथून भटाडीकडे जाणारा रोडचे बांधकाम अपूर्ण आहे. त्या रस्त्याच्या उरलेल्या भागाला त्वरित मान्यता देऊन रोडचे बांधकाम ...

Difficulty for passengers half way | अर्धवट रस्त्याने प्रवाशांना अडचण

अर्धवट रस्त्याने प्रवाशांना अडचण

चंद्रपूर : पडोली येथून भटाडीकडे जाणारा रोडचे बांधकाम अपूर्ण आहे. त्या रस्त्याच्या उरलेल्या भागाला त्वरित मान्यता देऊन रोडचे बांधकाम पूर्ण करावे, रेल्वे पुलाखालील भाग खोल असून, त्या रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंत उभारावी, तसेच पडोली ते तिरवंजा रोडवरील गावांमध्ये नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर यांच्यातर्फे सहायक अभियंता किशोर येडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पडोली चौकातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धूळ व रेतीच्या उडत असते. परिणामी, अपघाताची मालिका वाढली आहे. मागील दोन महिन्यांत तीन लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नागपूर रोड व घुग्घुस रोडवरील पडोली चौकातील ब्रेकरला मंजुरी देऊन, रस्ते स्वच्छ करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, नागाळा ग्राम पंचायत सदस्य विवेक धोटे, पडोली ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे, करण नायर आदी उपस्थित होते.

Web Title: Difficulty for passengers half way