शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण पांदण रस्त्याने अडचण

By admin | Updated: February 4, 2016 01:06 IST

तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला तीन किलोमीटरचा पांदण रस्ता गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे.

शेतकऱ्यांची कुचंबणा : निवेदन देऊनही प्रशासनाचे दुर्लक्षपोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला तीन किलोमीटरचा पांदण रस्ता गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे. सदर रस्ता पूर्ण करण्यासाठी पोंभुर्णा तालुका प्रशासनाला चार वर्षे होऊनही मुहूर्त सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील ग्राम पंचायतीअंतर्गत सन २०११ मध्ये रामपूर दिक्षीत येथील शेतशिवारामध्ये तीन किलोमीटरचा पांदण रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला. या रस्त्यावर शासनाचे लाखो रुपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु रस्ता मात्र चार वर्षे होऊनसुद्धा अपूर्णच ठेवण्यात आल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.ग्रामीण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे क्षणभंगुर ठरल्याचे चित्र या परिसरात पहायला मिळत आहे. सततच्या नापिकीमुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी तूर्तास हतबल होत आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे ध्ये डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही, याची साधी पाहणीसुद्धा वरिष्ठांकडून केली जात नसल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत आहे.पोंभूर्णा पंचायत समिती व तालुकास्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा स्वतंत्र विभाग असतानासुद्धा या अपूर्ण कामावर पांघरून झाकण्याचे नेमके काय कारण आहे, असा स्थानिक शेतकऱ्यांचा सवाल आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अपूर्ण रस्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)