शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

योजना मिळविण्यात अडचणी; हजारो शेतकरी वंचित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:11 IST

५,४२८ शेतकऱ्यांनी काढली फार्मर आयडी : ८ हजार ५९३ शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यात शेतीला प्राधान्य आहे. येथे १४ हजार २१ शेतकरी असून १८ जूनपर्यंत केवळ ५ हजार ४२८ शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित ८ हजार ५९३ शेतकऱ्यांची नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.

शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीस बल्लारपूर तालुक्यात सुरुवात झाली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी नांदगाव पोडे, विसापूर, आरवट, आमडी, कोर्टी मक्ता, पळसगाव, किन्ही, मानोरा, कोठारी, कवडजई या गावात तहसील कार्यालयामार्फत घेण्यात आले. शिबिर यात १८ जूनपर्यंत ५ हजार ४२८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केली आहे. परंतु जनजागृती सभा घेऊन सुद्धा ८ हजार ५९३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे असे शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

१८ जून पर्यंत ५ हजार ४२८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केली आहे. परंतु जनजागृती सभा घेऊन सुद्धा ८ हजार ५९३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे असे शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी करावीशेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या अॅग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी तालुक्यात सुरू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये फार्मर आयडीसाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

काय आहे शेतकऱ्यांसाठीचे फार्मर आयडी व लाभराज्य शासनाच्या अॅग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत, प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल स्वरूपातील एक अद्वितीय ओळख क्रमांक फार्मर आयडी दिला जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना विशेष क्रमांक व ओळखपत्र देण्यात येईल. हा क्रमांक आधार प्रमाणेच शेतीविषयक सर्व सरकारी योजनांमध्ये अनिवार्य असणार आहे. ओळख क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेती विकासासाठी इतर कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, किमान आधारभूत किंमत योजनेत खरेदीमध्ये नोंदणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे इत्यादी योजनेचा लाभसुलभरीत्या मिळणार आहे. 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर