सुरेश कोमावार ।लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : अभ्यासक्रमात गणित विषय म्हटले की, बऱ्याच विद्यार्थ्यांची पाचावर धारण बसते. परंतु, याबाबतचे तंत्र अवगत केल्यास हा विषय अत्यंत सोपा वाटतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, स्पर्धा परीक्षेचा मार्ग सोपा व्हावा, याकरिता घोसरी येथील अक्षय वाकुडकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या मित्रांसोबत गावातील प्रत्येक भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटली. याच लाभ विद्यार्थ्यांसह पालकांनाही होत आहे. अक्षय वाकुडकर यांनी मित्रांना सोबत घेऊन गणिताचा उपक्रम सुरू केला. स्पर्धा परीक्षेत गणितावर आधारित प्रश्न विचारले जातात. पण गणितीय सुत्रे अवगत नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांची गच्छंती होते. सहजपणे हसतखेळत भिंतीवर रेखाटलल्या गणितीय सुत्रांमधून विषय समजावा, याकरिता गावातील प्रत्येक भिंतीवर गणिताची सुत्रे चित्रांमधून रेखाटली. या उपक्रमाला 'मिशन' असे नाव दिले. भिंतीवर गणित सुत्रांची मांडणी केल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होत आहेत.हा प्रेरणादायी शैक्षणिक परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. अक्षय वाकूडर यांच्या संकल्पनेतील या नाविण्यपूर्ण उपक्रमात पप्पू सतेर, गणेश आरेकर, बाळू वाकुडकर, छत्रपती कोहपरे, स्वप्निल चुदरी, वैभव चुदरी, महेश चुदरी, प्रवीण चुदरी, आदित्य शुध्दलवार, राकेश मंडवगडे, सुनिल आरेकर, सुरज पाल, आकाश पोरटे, शुभम वाकुडकर, गणेश पोरटे, अभिजीत चुदरी, विजय वाकुडकर, रोशन पाल, सोनू चुदरी, मनोज चुदरी आदी मित्र भिंती रंगविण्यासाठी सहकार्य करत आहेत.
भिंतीवर रेखाटली गणिताची विविध सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:05 IST
अभ्यासक्रमात गणित विषय म्हटले की, बऱ्याच विद्यार्थ्यांची पाचावर धारण बसते. परंतु, याबाबतचे तंत्र अवगत केल्यास हा विषय अत्यंत सोपा वाटतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, स्पर्धा परीक्षेचा मार्ग सोपा व्हावा, याकरिता घोसरी येथील अक्षय वाकुडकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या मित्रांसोबत गावातील प्रत्येक भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटली. याच लाभ विद्यार्थ्यांसह पालकांनाही होत आहे.
भिंतीवर रेखाटली गणिताची विविध सूत्रे
ठळक मुद्देअक्षय वाकूडकरचा उपक्रम : विद्यार्थी हसत-खेळत शिकतात गणिताची कोडी