बाबासाहेबांच्या विचारानेच गावांचा विकास शक्य

By Admin | Updated: May 17, 2016 00:41 IST2016-05-17T00:41:02+5:302016-05-17T00:41:02+5:30

समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदीसह सर्वच क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार गावकऱ्यांनी केला....

Development of villages by Babasaheb's thinking is possible | बाबासाहेबांच्या विचारानेच गावांचा विकास शक्य

बाबासाहेबांच्या विचारानेच गावांचा विकास शक्य

कळमना येथे ग्रामसभा : संजय धोटे यांचे प्रतिपादन
राजुरा : समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदीसह सर्वच क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार गावकऱ्यांनी केला तरच गावाचा विकास शक्य असल्याने मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी मांडले.
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ग्राम उदय ते भारत उदय अभियाानांतर्गत व ग्राम पंचायत कळमना येथे शनिवारी आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड, संवर्ग विकास अधिकारी डी.पी. सपाटे, सहाय्यक गट विकास अधिकारी डी.बी. पानबुडे, उपअभियंता राकेश कुकडे, महिला व बालविकास अधिकारी तोतडे, कळमनाच्या सरपंच नूतन आत्राम, उपसरपंच स्नेहा आस्वले, मंगेश वाढई, निलेश ताजने, मंदा सिडाम, प्रभाकर पाल, सुनिता शेरकी, नंदकिशाोर वाढई, विठ्ठल पाल, बाळकृष्ण पिंगे, सुधाकर पिंंपळशेंडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. या योजनांचा लाभ येण्यासाठी नागरिकांनी समोर येण्याची गरज असल्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार सचिव डी.एन. क्षिरसागर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Development of villages by Babasaheb's thinking is possible