शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरातील दरोडेखोर वरोरा पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: February 12, 2015 00:48 IST

येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे.

वरोरा : येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी वरोरा शहरात दोन घरफोड्या केल्याची कबुली देत ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांनाही आज वरोरा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरोरा शहरातील बावणे लेआऊटमध्ये राहणारे मधुकर आसेकर हे २७ मे २०१४ रोजी आपल्या कुटुंबियांसह बाहेर गावी गेले असता, रात्री त्यांच्या घरात चोरी करून ५० हजार रुपयाचे सोने, चांदीचे दागिणे व ८० हजार रोख असा एक लाख ३० हजार रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. त्यानंतर ३ सप्टेंबर २०१४ रोजी बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील सेंट अ‍ॅन्स कॉन्व्हेंट नजीक राहणारे रवींद्र जोगी यांच्या घरी कुणीही नसल्याचे साधून ३१ हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिणे लंपात केले. अशा एकापाठोपाठ एक घरफोड्या करून चोरटे फरार होत असल्याने वरोरा पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे होते. दोन्ही चोरटे बल्लारपूर येथील असून गडचांदूर येथे भाड्याने खोली करून राहत होते. वरोरा शहरात चोरी करायची व गडचांदूरमध्ये राहायचे. त्यामुळे ते हाती लागत नव्हते. ते गडचांदूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खोलीवर धाड टाकली असता, अजय मधुकर काने (२०) व बजरंग बापूराव काने (३०) हे दोघेही खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वरोरा शहरातील दोन घरफोड्या केल्याची कबुली डीबी पथकास देत चोरीतील ६० हजार रुपयाचे दागिणे पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सांगळे, डीबी पथक प्रमुख उमाकांत गौरकार, नितीन जाधव, राकेश तुराणकर, प्रकाश पखान, अनिल बैढा, निलेश ठेंगे, निकेश मुळे यांनी केला. दोन्ही आरोपींकडून आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. (तालुका प्रतिनिधी)