१३० बंदिवानांसाठी त्वचारोग तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:45+5:302021-01-16T04:32:45+5:30

चंद्रपूर : जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे समता फाउंडेशन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदिवानांसाठी ...

Dermatology camp for 130 prisoners | १३० बंदिवानांसाठी त्वचारोग तपासणी शिबिर

१३० बंदिवानांसाठी त्वचारोग तपासणी शिबिर

चंद्रपूर : जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे समता फाउंडेशन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदिवानांसाठी त्वचारोग तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात १३० जणांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधीक्षक वैभव आगे, तर प्रमुख अतिथी म्हणून त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मनोज उरकुंडे, समता फाउंडेशनचे सदस्य विवेक झोडे, कारागृहचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने कारागृहातील बंदिवानांची तसेच कारागृह कर्मचाऱ्यांची तपासणी करून औषधोपचार केला. कारागृहातील १३० बंदिवान तसेच भगिनींनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. कारागृहाच्या वतीने अधीक्षक वैभव आगे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वितेसाठी तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, सुनील वानखडे, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, सुभेदार शिवराम चवळे, सीताराम सुरकार, रक्षक गौरव पाचडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Dermatology camp for 130 prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.