तोडगा न निघाल्याने डेरा आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:06+5:302021-03-07T04:25:06+5:30

चंद्रपूर : डेरा आंदोलनातील संतप्त कामगारांनी वैद्यकीय महाविद्यालयावर शुक्रवारी हल्लाबोल केल्यानंतर हे आंदोलन चांगलेच चिघळले. आठ महिन्यांच्या थकीत पगारामुळे ...

Dera agitation continues as no solution is reached | तोडगा न निघाल्याने डेरा आंदोलन सुरूच

तोडगा न निघाल्याने डेरा आंदोलन सुरूच

चंद्रपूर : डेरा आंदोलनातील संतप्त कामगारांनी वैद्यकीय महाविद्यालयावर शुक्रवारी हल्लाबोल केल्यानंतर हे आंदोलन चांगलेच चिघळले. आठ महिन्यांच्या थकीत पगारामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांचे उग्र रूप पाहिल्यानंतर पोलीस व जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून हालचालींचा वेग वाढविला आहे. मात्र अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्ट कार्यप्रणालीमुळे कामगारांचे वेतन देण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, विश्व सिंधी सेवा संगमचे डेरा आंदोलनाला समर्थन दिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दंडा लेकर हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डेरा आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा २७ वा दिवस होता. विविध संघटना व व्यक्तींनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. विश्व सिंधी सेवा संगमच्या शिष्टमंडळाने आपले समर्थन जाहीर केले. विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष मोहन आसवानी, पदाधिकारी बोनी आसवानी, सागर दुधानी, विशाल गिडवानी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. ग्रीन प्लॅनेटचे प्रा. सुरेश चोपणे, काँग्रेस ओबीसी सेलचे उमाकांत धांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गेडाम तसेच श्यामसुंदर पेनुरकर यांनीसुद्धा पाठिंबा जाहीर केला.

Web Title: Dera agitation continues as no solution is reached