शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पट्ट्यांसाठी वंचितचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST

नागभीड : तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत, तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या ...

नागभीड : तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत, तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

पिढ्यान्‌पिढ्या कसत असलेल्या आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे शासनाने दिलेले नाहीत. शेतकऱ्यांनी शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे दावे टाकलेले आहेत. दावे टाकले असतानाही व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक शेतीचे नुकसान करणे, शेतकऱ्यांना धमकी देणे असे प्रकार करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावेत. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीद्वारे नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून वन प्रशासन व प्रशासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, अरविंद सांदेकर, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, सुभाष थोरात, अश्विनी मेश्राम, विलास श्रीरामे, शैलेंद्र बारसागडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

030721\img-20210703-wa0038.jpg

फोटो- धरणे देताःना