खासगी शाळेतील शैक्षणिक फी माफीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:58+5:302021-03-17T04:28:58+5:30

बल्लारपूर : कोरोना महामारीमुळे सर्व खासगी शाळा बंद आहेत‌. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी शाळेची ...

Deprived Bahujan Aghadi agitation for waiver of tuition fees in private schools | खासगी शाळेतील शैक्षणिक फी माफीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

खासगी शाळेतील शैक्षणिक फी माफीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

बल्लारपूर : कोरोना महामारीमुळे सर्व खासगी शाळा बंद आहेत‌. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी शाळेची फी भरणे सर्वसामान्य पालक वर्गाला अवघड जात आहे. त्यातच खासगी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना जबरदस्तीने फी भरण्याकरिता सांगितले जात आहे. शैक्षणिक फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही अशी तंबी शाळेकडून दिली जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असून या सत्रातील संपूर्ण शैक्षणिक ती माफ करण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात बल्लारपुरात तीव्र आंदोलन करण्यात आले.

खासगी शाळांची फी माफ करण्यात यावी, करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान राजू झोडे यांनी शाळेच्या मनमानी कारभार विरोधात तीव्र संताप व्यक्त करून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले. तसेच तत्काळ शाळेची फी माफ करण्याकरिता प्रशासनाने पाऊल उचलावे अन्यथा येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीद्वारा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून प्रशासनाची व खासगी शालेय व्यवस्थापनाची झोप उडवणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीद्वारे देण्यात आला.

यावेळी संपत कोरडे, प्रशांत झामरे, महेश माकोडे, संदेश करवाडे, सचिन पावडे, नरेंद्र सोनारकर, छोटू साठे, वंदना तामगाडगे, दिनेश वाळके, विवेक साठे, स्वप्नील सोनटक्के, दिनेश भगत, दुरेश तेलंग, डी एन खैरे, रवी वनकर, शीला शेट्टी, स्वाती सुखदेव, रुपाली सोनारकर आदी उपस्थित होते.

Web Title: Deprived Bahujan Aghadi agitation for waiver of tuition fees in private schools