पगारदार कर्मचाऱ्यांचे थकित हप्ते खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:28+5:302021-02-06T04:50:28+5:30
भद्रावती : पगारदार शिक्षकांचे नियमित वेतनातून दरमहा एलआयसी हफ्ते कपात होवूनही प्रशासकीय वा तांत्रिक बाबीमुळे रकमा अप्राप्त दाखवून मॅच्युरिटीच्या ...

पगारदार कर्मचाऱ्यांचे थकित हप्ते खात्यात जमा करा
भद्रावती : पगारदार शिक्षकांचे नियमित वेतनातून दरमहा एलआयसी हफ्ते कपात होवूनही प्रशासकीय वा तांत्रिक बाबीमुळे रकमा अप्राप्त दाखवून मॅच्युरिटीच्या वेळेस कपात केल्या जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे खातेदारांचे थकित हप्ते वेळत जमा करण्यात यावे, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने एलआयसी व्यवस्थापकाला निवेदनाद्वारे केली आहे.
खातेदारांनी कार्यालयात चौकशी केली असता स्वत: संबंधित कार्यालयातून शेड्युल वा इतर बाबी आणा, असे सांगितले जाते. कर्मचाऱ्यांना सुटी काढून व पैसा खर्च करून संबंधित कामे स्वत: करावी लागतात. यात त्यांना नाहक मानसिक त्रास व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे जि. प. प्राथ. शिक्षकांच्या एलआयसी खात्यातील महिना व वर्षनिहाय तयार करून संबंधित प्रशासकीय कार्यालयाला पाठवून व उचित कार्यवाही करून त्वरित संबंधित निधी खातेधारकाच्या खाती जमा करावा, असे निवेदन प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने पी. आर. सावर्लापूरकर, व्यवस्थापक एलआयसी शाखा वरोरा यांना देण्यात आले. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे शंकर मिरे, पवन शर्मा, श्रीकृष्ण गुजरकर, प्रभाकर मेंगरे, मोरेश्वर विद्ये, किशोर चंदनखेडे आदी उपस्थित होते.