शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण

By admin | Updated: October 10, 2015 00:16 IST

माजरी वस्ती येथील शेतकरी सुरेश पुंडलिक दैवलकर यांचे नऊ एकर शेतातील कपाशीचे झाडे अचानक करपली.

पंचनाम्याचा अहवाल अप्राप्त : बळीराजा हवालदिलमाजरी : माजरी वस्ती येथील शेतकरी सुरेश पुंडलिक दैवलकर यांचे नऊ एकर शेतातील कपाशीचे झाडे अचानक करपली. याबाबत चौकशी करण्यात आली मात्र अज्ञात रोगामुळे कपाशी नष्ट झाली की, बियाणे, खत, मशागत की इतर कोणती कारणे आहेत हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. यामुळे बळीराजाची मोठी आर्थिक कुचंबणा झाली आहे.एक महिन्यापूर्वी दैवलकर यांनी कपाशीचे पीक अचानक वाळले जात असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी व तलाठी यांना लेखी निवेदनाद्वारे केली. यानंतर वरिष्ठ अधिकारी नागपूर-वरोरा यांना सुद्धा भ्रमणध्वनीद्वारे कळविले. तालुका कृषी पर्यवेक्षक यांनी शेतीचा पंचनामा केला. मात्र पुढे काय झाले, कपाशी करपली कशी, कारणे आणि वरिष्ठांचा अहवाल कुठे गेला, हे अद्यापही कळू शकले नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. नऊ एकर कपाशीच्या शेतीसाठी आतापर्यंत बी-बियाणे, खत, फवारणी, मजुरी, रखवालदारी व इतर मशागत यासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये खर्च आला आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कृषितज्ज्ञ पथक महाबीज बियाणे कंपनी, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील संशोधक यांच्याद्वारे पाहणी व यानंतर प्रयोगशाळा द्वारा अहवाल मिळणार असल्याचे कृषी पर्यवेक्षक म्हणाले. आश्वासन देवून दहा दिवस उलटले. मात्र कपाशीच्या अज्ञात आजाराचा अद्यापही या शेतकऱ्याला अहवाल प्राप्त झाला नाही. नुकसानीचा अहवाल मिळाला असता तर वाळलेले कापूस शेती मोडीस करुन या शेतजमिनीवर रबी पिकाची पेरणीची तयारी करता आली असती. गरजेच्या वेळी सरकारी यंत्रणा वेळेवर मदत करीत नाही आणि एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर कुटुंबीयांच्या तोंडाला मदतीचे पाने पुसली जातात. मात्र संकटकाळी हवालदिल झालेल्या बळीराजाला शेतकऱ्यांसाठी विशेष लक्ष दिले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)