शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुरुच्या रूपात दानव ! पाचवीतील मुलीच्या विनयभंगाने चंद्रपुरात संतापाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:32 IST

Chandrapur : पॉक्सोखाली अटक! चंद्रपूरच्या शाळेत शिक्षकाचा संतापजनक कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यादानाचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकाने शिक्षकीपेक्षाला काळिमा फासून चक्क पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी चंद्रपुरात समोर आली. याप्रकरणी लक्ष्मीकांत धर्मपुरीवार (५२) या शिक्षकाला पडोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या एका शाळेत शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी पाचव्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आपल्या मैत्रिणीला दिली. तिने ही माहिती पीडित मुलीच्या आईला सांगितली. त्यांनी लगेच त्या शाळेत कार्यरत असलेल्या दुसऱ्या शिक्षिकेला याबाबत जाब विचारला असता, त्यांनी शाळेत चौकशी करते, असे सांगितले. त्या शिक्षिकेने शाळेत चौकशी केल्यानंतर व्यवस्थापन समिती, तसेच पं.स. प्रशासनाला सांगितले. त्यांनी लगेच शाळेत येऊन चौकशी केली. त्यानंतर वरिष्ठांना आदेशाने पडोली पोलिसात तक्रार केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शिक्षक लक्ष्मीकांत धर्मपुरीवार याच्याविरुद्ध बीएनएस ७४ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार योगेश हिवसे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रोशन इरपाचे करीत आहेत.

प्रशासनाने घेतली दखलशाळेत विनयभंगाची माहिती चंद्रपूर पंचायत समिती प्रशासनाला मिळताच गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकारी मनोज गौरकार, केंद्रप्रमुख विवेक वल्लभकर, प्रभारी विस्तार अधिकारी प्रकाश झाडे यांची चमू दाखल झाली. त्यांनी सर्वांशी चर्चा करून वरिष्ठांना माहिती दिली. त्याच्या आदेशान्वये ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरPOCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारी