जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 24, 2014 23:47 IST2014-07-24T23:47:37+5:302014-07-24T23:47:37+5:30
शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
चंद्रपूर : शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व स्वराज्य शेतकरी सेवा संघाचे संस्थापक विश्वास कानफाडे, चंद्रपूर - गडचिरोली - वर्धा विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे, विभागीय सचिव उमेश ना. करपे यांनी केले. शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे उपलब्ध करून द्यावी. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गतवर्षी अतीवृष्टी व पुराची नुकसान भरपाई द्यावी, शेतमालाला भाव द्यावा, कृषी पंपाना तातडीने वीज जोडणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, चंद्रपूर जिल्ह्यात धूळखात असलेले लघूसिंचन तातडीने सुरू करावे, बेरोजगार भूमीपूत्रांना खाजगी उद्योगात जिल्ह्यातील नोकर भरती करण्यात यावी. कारखान्यांनीही भूमीपूत्रांनाच बेरोजगाराच्य खाईत लोटल्या जात असल्याची विदारक स्थिती आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम अद्यापही अनेक शेतकरी बांधवाना मिळालेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्प धुळखात आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चूनही शेतीसाठी सिंचन उपलब्ध होत नाही. केवळ देखाव्यासाठी सिंचन प्रकल्प उभारले की काय अशी वास्तव स्थिती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या, अशी विनंती करण्यात आली.
धरणे आंदोलनात अॅड. संजय अटकारे, रवी रायपुरे, राजू खुटे, विजेंद्र बक्सेरिया, आकाश बक्सेरिया, आदर्श खुटे, मारोती डोर्लीकर, पोर्णिमा लांडे, श्वेता मारेकर, अंजना क्षीरसागर, कलावती थेरे, शांताबाई पिदूरकर, विद्या कोकाटे, सुलक्षणा डेकाटे, मस्तान शेख, कालीदास देवगडे, बिरबल गुर्जल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)