शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:10 AM

भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपूर भूषण पुरस्काराने सात जण सन्मानित

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा जगभर गौरव केला जातो. त्यांच्या संविधानामुळे जगात भारतीय लोकशाहीच्या गौरव केला जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.येथील भारतीय युथ टाईगर्स संघटनेच्या वतीने स्थानिक जयभीम चौक विद्यानगर वॉर्ड येथे सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य करणाºयांना बल्लारपूर भूषण पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार समारंभ रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ना. अहीर बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते बल्लारपूर भूषण पुरस्काराने आनंद तेलंग, प्रतीक तितरे, डॉ. पी. यू. जरीले, सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास सुंचूवार, नगरसेवक विनोद यादव, कुसूम वानखेडे, आदित्य शिंगाडे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी ना. अहीर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया कार्यकर्त्यांचे यश राजकीय मंडळी हिरावून घेतात. मात्र त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व अन्य क्षेत्रात प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच ते देशाचे भाग्यविधाते ठरले. त्याचे प्रेरणादायी विचार कोणीही दडपू शकत नाही. त्यांच्या विचारावर आधारीत नवीन क्रांती समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे, असे ते म्हणाले.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, युथ टाईगर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे, प्रशांत मेश्राम, प्रदीप उमरे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांची उपस्थिती होती. दरम्यान क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे अरुण हजारे, अमरनाथ एक्का, आश्विनी उके, इंद्रजित, निशाद, मनोजडे, स्वाती हजारे, निता वर्मा, सुनील माझी, अंकीता चौधरी, रोहिनी डांगे, पारस कौशीक, रमेश नातरर्गी, पास्टर पोर्तलावार यांना खेलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत झामरे यांनी केले. संचालन अ‍ॅड. पवन मेश्राम यांनी तर आभार रविकुमार पुप्पलवार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.