तीन लाखांची मागणी, मिळाले १४ हजार डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:36+5:302021-04-20T04:29:36+5:30

कोरोना बाधित व्यक्ती व मृतकांचीही संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे प्राधान्य गटातील नागरिकांनी प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी करीत आहेत. ...

Demand for Rs 3 lakh, got 14,000 doses! | तीन लाखांची मागणी, मिळाले १४ हजार डोस !

तीन लाखांची मागणी, मिळाले १४ हजार डोस !

कोरोना बाधित व्यक्ती व मृतकांचीही संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे प्राधान्य गटातील नागरिकांनी प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने या आठवड्यात तब्बल दोन लाख ७६ हजार डोसची मागणी केली होती; मात्र सोमवारी केवळ १४ हजार डोस मिळाल्याने काही केंद्र बंद ठेवावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त केंद्र सुरू करण्यात आले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अन्य एक अशा दोन केंद्रांचा अपवाद वगळल्यास सर्व केंद्रांमधून कोविशिल्ड लस देणे सुरू आहे. हेल्थ केअर, फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षांवरील व सहव्याधीसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच १ एप्रिलपासून लस घेण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ लागली, यासाठी प्रशासनाने केंद्रांची संख्या वाढविली; मात्र सोमवारी १४ हजार डोस मिळाल्याने लसटंचाई कायम राहणार आहे.

केंद्रातून परत येणाऱ्यांचा संताप

लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने केंद्रांची संख्या वाढविली; मात्र मागणीप्रमाणे डोस मिळत नाहीत, त्यामुळे कोणतेही केंद्र सलग सात दिवस सुरू ठेवणे प्रशासनाला शक्य झाले नाही. लसीचा तुटवडा असल्याची कुणकुण लागल्यानंतर नागरिक सकाळपासूनच केंद्रावर गर्दी करतात; परंतु लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.

Web Title: Demand for Rs 3 lakh, got 14,000 doses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.